नागपूर शहर: ट्रकच्या धडकेत सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू, कळमना हद्दीत अपघात
24 जूनला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन कळमना हद्दीतील कळमना मार्केट परिसरात अज्ञात ट्रकने सायकलला धडक दिल्याने ३० वर्षीय लवनेश गुलाबचंद जनवारे यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.