घनसावंगी: मासेगावात खरीप मार्गदर्शन कार्यशाळा; हवामान अनुकूल शेतीवर भर..
मासेगावात खरीप मार्गदर्शन कार्यशाळा; हवामान अनुकूल शेतीवर भर.. आज दिनांक 30 गुरुवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील मासेगाव येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित खरीप हंगाम नियोजन मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शाश्वत व हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.उप कृषी अधिकारी संजय लोंढे यांनी मार्गदर्शन करताना रुंद वरंबे (बेड) पद्धतीने लागवडीचे महत्त्व अधोरेखित केले. स