गोंदिया जिल्ह्यात 'अरुणोदय' सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांचे जनजागृतीचे आवाहन गोंदिया: राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने सिकलसेल ॲनिमियाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी 'अरुणोदय' हे विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, नागरिकांनी या मोहिमेत उस्फूर्तपणे सहभागी होऊन आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी केले आहे.