नागपूर शहर: सिग्नलवर थांबलेल्या तरुणीला क्रेनची धडक; हुडकेश्वर परिसरात भीषण अपघात
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदय नगर चौकात एका भरधाव क्रेनने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत २८ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे.९ मे रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास, मृणालिनी बारसागडे या त्यांच्या ॲक्टिव्हाने जात होत्या. उदय नगर चौकात सिग्नल लाल असल्याने त्या थांबल्या असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव क्रेनने (MH-49 BW-6803) त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली.या धडकेमुळे मृणालिनी खाली पडल्या आणि त्यांच्या छातीला व पायाला गंभीर दुखापत झाली.