नागपूर शहर: नागपुरात १ हजार कोटींचा भू-घोटाळा; मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी
'सामान्य माणूस' संघटनेचे राम सोळंके यांनी शहरातील एका मोठ्या भू-घोटाळ्याचा पर्दाफाश केला असून, यात सुमारे १ हजार कोटी रुपयांची जमीन भू-माफियांनी हडपल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दिलीप ग्वालवंशी, दीपक दुबे, रश्मी जोशी आणि त्यांच्या साथीदारांनी १९८५ पासून एन.आय.टी. (NIT) च्या संगनमताने हा घोटाळा केल्याचा आरोप आहे.