मानगाव: मुंबई-गोवा महामार्गावर सलग नवव्या दिवशीही वाहतूककोंडी
Mangaon, Raigad | May 11, 2026 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरून मुंबई, ठाणे, तसेच पुणे येथून उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक तसेच कोकणवासी कोकणात निघाले आहेत. परंतु खांब कोलाडपासून इंदापूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून गेल्या नऊ दिवसांपासून हीच परिस्थिती दिसून येत आहे. यामुळे 'रोज मरे त्याला कोण रडे', अशी अवस्था दिसून येत असून ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भर उन्हात उभे राहून रायगड पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.