नागपूर शहर: सक्करदरा परिसरात कारवाई: घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यावर गुन्हा दाखल
सात जूनला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती गॅस सिलेंडर्सचा व्यावसायिक वापर आणि नियमबाह्य साठवणूक करणाऱ्या एका आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ८५,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ज्यामध्ये 7 घरगुती HP गॅस सिलेंडर,8व्यावसायिक HP गॅस सिलेंडर,2व्यावसायिक शेगडी मोबाईल फोन आणि इतर साहित्याचा समावेश आहे.