नागपूर शहर: नागपुरात खळबळ! मेट्रो स्टेशन शेजारील घरात सापडल्या जिलेटीन कांड्या आणि डिटोनेटर्स : पोलीस उपायुक्त राहुल मदने
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 7 एप्रिल ला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार, उपराजधानीतील मध्यवर्ती आणि वर्दळीचा भाग असलेल्या सीए रोडवरील दोसर भवन चौकात आज सकाळी जिवंत स्फोटके आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही स्फोटके मेट्रो स्टेशनच्या अगदी बाजूला असलेल्या एका घराच्या परिसरात आढळून आली आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.