लातूर: लातूरच्या हरंगुळमध्ये कुंटणखान्याचा पर्दाफाश : पोलिस धाडीत महिला गजाआड, तीन पिडितांची सुटका
Latur, Latur | Sep 16, 2025 लातूर : लातूर शहरातील हरंगुळ शिवार मांजरा रेल्वे गेट परिसरातील एका घरात चालणारा कुंटणखाना पोलिसांच्या धाडीत उघडकीस आला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) पथकाने केलेल्या या कारवाईत एक महिलेस अटक करण्यात आली असून तिथून तीन पिडित महिलांची सुटका करण्यात आली.