नागपूर शहर: विदर्भ-कोकण रेल्वेने जोडले! नागपूर-मडगाव एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी; नितीन गडकरींच्या हस्ते हिरवा झेंडा
विदर्भ आणि कोकण या दोन महत्त्वाच्या भागांना रेल्वेने जोडणाऱ्या नागपूर-मडगाव एक्स्प्रेसच्या नियमितीकरणाचे लोकार्पण आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रवाशांची मागणी मान्य करत रेल्वे बोर्डाने या विशेष गाडीला आता कायमस्वरूपी दर्जा दिला आहे.