औंढा नागनाथ तालुक्यातील म्हाळसगाव शिवारातील मधोमधी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर वाहन औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाने दिनांक 11 डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी दहा वाजे दरम्यान पकडले यानंतर ट्रॅक्टर हेड चार लाख रुपये व ट्रॉली 80 हजार रुपये व एक ब्रास वाळू तीन हजार रुपये असा 4 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मुद्देमाल ट्रॅक्टर वाहन औंढा नागनाथ पोलीस ठाणे आवारात आणून लावण्यात आले