नागपूर शहर: गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकाचा संताप; सिविल लाइन्स येथील एजन्सीत हंगामा, बघा वायरल विडिओ
नागपूरमधील पॉश समजल्या जाणाऱ्या सिविल लाइन्स परिसरातील एका गॅस एजन्सीच्या कार्यालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या एका ग्राहकाने कार्यालयात घुसून महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहक अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या प्रतीक्षेत होता. मात्र, वारंवार विचारणा करूनही त्याला सिलेंडर मिळत नव्हता.