नागपूर शहर: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम गजाआड: कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 15 मे ला दुपारी 3:30 ला दिलेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २२ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे प्रलोभन दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. याबद्दलचे अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.