रोहा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सुतारवाडी येथील कार्यालयात नागरिकांनी घेतली भेट
Roha, Raigad | Oct 17, 2025 आज शुक्रवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर सुतारवाडी येथील कार्यालयात रायगड जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांनी भेट घेत, त्यांच्या समस्या व मागण्या मांडल्या. सर्वांच्या समस्या गांभीर्याने जाणून घेतल्या व त्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच यावेळी दिवाळीचे औचित्य साधत उपस्थित नागरिकांना आणि पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उज्ज्वल भविष्य, उत्तम आरोग्य व सुख-समृद्धीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.