शिरोळ: कासारवाडी येथे बिबट्याच्या हल्यात जर्मन शेफर्ड कुत्र्याचा मृत्यूने उडाली खळबळ,बिबट्याच्या हालचालीवर ड्रोनने लक्ष
कासारवाडी येथील डोंगर परिसरात बिबट्याच्या सतत वावर आहे.वाघजाई मंदिर समोरील बडव्यांच्या मळा परिसरात आनंदा नारायण गांजणे यांची शेतात वस्ती आहे.या ठिकाणी गुरुवारी रात्री बिबट्याने झडप घालत जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यावर प्राणघातक हल्ला केला.यामध्ये कुत्र्याचा मुत्यु झाला,शुक्रवारी सकाळी कुत्र्याचे धड उसाच्या शेतात पोट फाडून खाल्लेल्या अवस्थेत आढळून आले.या ठिकाणच्या पाऊलखुणा व कुत्रा खाण्याची पध्दत बिबट्याची असल्याचा दुजोरा रेस्कु टिमचे सदस्य व प्राणी मित्रानी दुजोरा दिला आहे.