कराड: कराड शहर व परिसरात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या दोघांना सातारा आणि सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी केले हद्दपार
Karad, Satara | Oct 17, 2025 कराड परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करून जनतेला वेठीस धरणाऱ्या गुन्हेगारी टोळीतील दोन जणांना पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरणाचे अध्यक्ष तुषार दोशी यांनी सातारा आणि सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयातून शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजता पत्रकारांना माहिती देण्यात आली. आशिष उर्फ बाळू अरुण कुर्ले वय २८, रा. शनिवार पेठ कराड आणि श्रीधर उर्फ भैय्या काशिनाथ थोरवडे वय २१, रा. बुधवार पेठ कराड अशी या हद्दपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.