यावल: यावल येथील बालकाचे अपहरण प्रकरणी काकाच निघाला मास्टरमाइंडर; काकाला घेतले ताब्यात, यावल पोलिसात गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Jan 10, 2026 यावल शहरातील महाजन गल्लीतून आदित्य बेंडाळे वय ६ या बालकाचे शुक्रवारी अपहरण झाले होते. घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. तर पोलीस तपासात गुन्ह्याचा मास्टरमाइंड या मुलाचा काका वैभव बेंडाळे हा असल्याचे समोर आले त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बालकाला सुखरूप त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तर याप्रकरणी दोन जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.