अंजनगाव सुर्जी येथील श्री विठ्ठल मंदिर, खोडगाव नाका येथे आज रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता गुणवंत विद्यार्थी गुणगौरव,शिष्यवृत्ती वितरण व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. अखिल भारतीय बारी कर्मचारी सामाजिक संस्था,संस्कार वाचनालय व संस्कार अभ्यासिका, दयानंद नगर यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सन २०२४–२०२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी,१२ वी व पदवी परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.