मोर्शी: वरला येथे पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत अतिक्रमणधारकांना दिल्या सूचना
आज दिनांक 15 ऑक्टोबरला दुपारी एक वाजता पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत अतिक्रमण धारकांना सूचना देऊन, येत्या तीन ते चार दिवसात अतिक्रमण काढण्याबाबत सांगण्यात आले आहे. वरला ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज भारसाकडे यांनी वरला येथील नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला व सार्वजनिक रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणाबाबत अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असून, त्या अनुषंगाने रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना सूचना देऊन तीन ते चार दिवसात अतिक्रमण हटविल्यास पोलीस कारवाई करणार असल्याची सूचना नागरिकांना देण्यात आली