नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मतदान दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी घोषित केलेली आहे. सदर निवडणूकामी परिवहन उपक्रमाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यास्तव दि.14/01/2026 सकाळी व दि.15/01/2026 रोजीचे दुपारी बस संचलन विस्कळीत होण्याची शक्यता असून काही बसमार्गावरील प्रवाशी बससेवा बंद करण्यात येणार आहे. तरी तात्पुरत्या स्वरूपात प्रवाशी जनतेस होणाऱ्या गैरसोयीबद्दल नमुंमपा परिवहन उपक्रम दिलगीर आहे. प्रवाशी जनतेने नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 या कालावधीत उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.