महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे मालवाहू ऑटो व दुचाकीच्या समोरासमोरील झालेल्या धडकेत एक जण जागीच ठार तर दोन शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज दि.१३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास फुलसावंगी ते किनवट रोडवर शिवरामजी मोघे कॉलेज समोर घडली. प्राथमिक माहितीनुसार फुलसावंगीच्या दिशेने येणाऱ्या एमएच- २९ बीडी-३७५८ या मालवाहू ऑप्पे रिक्षाने किनवट कडे जाणाऱ्या दुचाकी क्र एम. एच.२९ सी एन ६८७२ ला जोरदार धडक दिली.