कर्जत: विश्वासघाताची परिसीमा; लग्नाच्या बहाण्याने शारीरिक शोषण
Karjat, Raigad | Mar 27, 2026 कर्जत तालुक्यातील ममदापूर येथील एका कॉलेजमधील एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सदर कॉलेजमधील कार्यरत लॅब असिस्टंटने कॉलेजमधील शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केले आहेत. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार संबंधित लॅब असिस्टंटच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला लोणावला पोलीसांनी अटक केली आहे.