भोकरदन: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा फुले चौक येथे भव्य मिरवणूक काढत आदिवासी दिन साजरा
आज दिनांक 9 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील महात्मा फुले चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुख्य शहराच्या रस्त्यावर ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला आहे, याप्रसंगी पारंपारिक वाद्यांना प्रधान्य देत हजारो समाज बांधवांनी उपस्थितिलावत हा आदिवासी दिन साजरा करण्यात आला आहे.