रामटेक: देवलापार क्षेत्रात एकीकडे वाघांचे हल्ले तर दुसरीकडे जंगलात प्रूनिंग व कॉपीसिंगची बाल मजूर करतात कामे
Ramtek, Nagpur | Mar 23, 2026 पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत वाघांचे हल्ले आता नेत्याचीच बाब झाली आहे. वाघांची प्रचंड दहशत आहे. तर दुसरीकडे बालमजुरांकडून जंगलात प्रूनिंग व कॉपीसिंगची कामे करून घेतली जात आहेत. देवलापर प्रादेशिक वन विभागांतर्गत येणाऱ्या देवलापार ते बेलदा या रस्त्यादरम्यान टूयापार गावाजवळ बाल कामगारांकडून काम करून घेत असल्याचे दृश्य मागील काही दिवसांपासून बघावयास मिळत आहेत. सध्या तेंदूपत्ताचा हंगाम सुरू आहे. या कामात हे बालमजूर जुम्पले आहेत.