सातारा: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात रिक्षा चालविण्याचा लुटला आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Satara, Satara | Oct 18, 2025 सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व असून रयतेचे राजे म्हणून ती ओळखले जातात. सर्वसामान्य जनतेशी त्यांनी जोडलेली नाळ आजही कायम असून धनत्रयोदशी दिवशी शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मंत्री भोसले यांनी रिक्षा चालवत सर्वांना सुखद धक्का दिला. मंत्री भोसले हे सातारा शहरात नेहमीच नागरिकांबरोबर छोट्या मोठ्या व्यावसायिकांबरोबर समरस होत असल्याचे चित्र अनेक वेळा पहावयास मिळते. त्यांना जनतेमध्ये राहणे नेहमीच आवडते.