ठाणे: कळवा येथे पहिल्या मजल्याचा स्लॅप थेट कोसळला तळमजल्यावर, ऐन सणासुदीत 50 रहिवाशी बेघर, दोन जण....
Thane, Thane | Oct 19, 2025 कळवा परिसराच्या विटावा येथे एका इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅप खेळतो तळमजल्यावर कोसळल्याची घटना घडली. रात्री उशिराच्या सुमारास अचानक स्लॅप तळमजल्यावर कोसळल्याने तळमजल्यावर असलेले संजय भुतेकर आणि योगिता उतेकर गंभीर जखमी झाले. त्यानंतर सर्व टीम घटनास्थळी दाखल झाल्या आणि इमारतीची पाहणी केली असता इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर 50 रहिवाशांचे इतरत्र स्थलांतर करून इमारत सील केली. ऐन सणासुदीच्या काळात रहिवाशांना बेघर व्हावे लागले