नागपूर शहर: अल्पवयीन मुलीशी साक्षगंध, बलात्कार करून केले गर्भवती, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अजनी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अंशुल नाडे याला अटक केली आहे. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.पीडितेचे वडील व्यसनाधीन असून घरात नेहमीच वाद होत असत. याच कौटुंबिक परिस्थितीचा गैरफायदा घेत वडिलांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच आरोपीशी तिची सगाई जमवली होती. त्यानंतर, लग्नाचे आश्वासन देऊन आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले.