नागपूर शहर: देवीच्या मंदिरातून सोन्याचे दागिने चोरणारे दोघे ताब्यात : साईनाथ रामलोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक
धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामलोड यांनी 5 जूनला दुपारी 1 वाजता दिलेल्या माहितीनुसार देवीच्या मंदिरातून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींना धंतोली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमाने तपास करत अटक केली आहे. आरोपीं विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामलोड यांनी दिली आहे