हिंगोली: खाजगी बस धारकांकडून अधिकचे भाडे आकारल्यास तक्रार करावी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे
हिंगोली, आगामी सणासुदीच्या काळात प्रवासी हे मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे खाजगी प्रवासी बसधारकांकडून मनमानी भाडेवाढ करण्यात येते. वास्तविक खाजगी प्रवासी बसेसने एसटी महामंडळाने विशिष्ट बस संवर्गासाठी विहित केलेल्या भाड्याच्या दीडपट पेक्षा अधिक आकारु नये, असे निर्देश परिवहन आयुक्तांनी वेळोवेळी दिलेले आहेत. तसेच याबाबत कमाल भाडे दर शासनाने दि. 27 एप्रिल, 2018 च्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहेत. अधिकचे भाडे आकारल्यास प्रवाशांनी हिंगोली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ई-मेलव