औंढा नागनाथ: जलाल दाभा येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा येथे दिनांक 30 नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी साडेतीन वाजता क्रांतीसुर्य धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेची व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावच्या प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यादरम्यान पारंपारिक आदिवासी नृत्य सादर केले यावेळी समाज बांधव ग्रामस्थ महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमास मा.आ.डॉ संतोष टारफे सरपंच सुदाम खोकले शिवाजी पोले ग्रामस्थ उपस्थित होते