लातूर -राज्याच्या सहकार क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या मांजरा परिवारातील मेरुमणी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा २०२५-२६ चा गळीत हंगाम सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जोमात सुरु आहे.कारखान्याकडे ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत गाळपास आलेल्या ऊसासाठी प्रति मेट्रिक टन २७५० रुपये प्रमाणे उसाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.