नागपूर शहर: जरीपटका येथे मोबाईल दुकानातील चोरीचा उलगडा; अल्पवयीनासह एक ताब्यात: अनिल ताकसांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी 29 जूनला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या जरीपटका परिसरात मोबाईल दुकानाचे शटर तोडून ३३ मोबाईल लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याने ऋषभ कावरे याच्या साथीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दिली आहे.