जागतिक क्षयरोग दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली.
2.7k views | Jalna, Maharashtra | Mar 24, 2026 जालना: आज दि.२४/३/२६ रोजी मा.श्रीमती आशिमा मित्तल जिल्हाधिकारी जालना व मा.श्रीमती पी.एम.मिन्नु मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरात भव्य क्षयरोग जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा.श्री राजेंद्र गाडेकर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक सा.रु.जालना, मा.डॉ.गजानन मस्के अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.जालना व डॉ.जी.एम.कुडलीकर जिल्हा क्षयरोग अधिकारी जालना तसेच डॉ.चारुस्मीता हवालदार अध्यक्ष आयएमए यांच्या शुभहस्ते रॅलीस हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरुवात करण्यात आली.