जालना: बकरी चोरी करणारा आरोपी जेरबंद; १८ गुन्हे उघडकीस; चोरीसाठी वापरलेली स्वीफ्ट कार व साहित्य जप्त; ४ लाख १ हजाराचा मुद्देमाल
Jalna, Jalna | Sep 25, 2026 जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील दीड ते दोन वर्षांपासून बकरी चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपीकडून बकरी चोरीसाठी वापरण्यात आलेली स्वीफ्ट कार आणि चोरीचे साहित्य असा एकूण ४ लाख १ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौकशीदरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी दाखल असलेले बकरी चोरीचे तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले आहेत. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी९ वाजता मिळालेल्या माहितीनुसार विविध ठिकाणी चोरी केली.