नागपूर शहर: टीव्ही टॉवर जवळ झाडावरून पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू : विजय दिघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी 24 एप्रिलला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,गिट्टीखदान परिसरातील कृष्णानगर येथील रहिवासी मधुकर नेवारे (वय ७५) यांचा झाडावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. २२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास टीव्ही टॉवरजवळ आंबा काढण्यासाठी ते झाडावर चढले होते. यावेळी अचानक पाय घसरून ते खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान दुपारी २ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गिट्टीखदान पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद.