महागाव: तालुक्यातील पिंपरी येथे नऊ फूट लांबीचा अजगराला सर्प मित्रांनी पकडून जंगलात सोडले
महागाव तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी नेते जगदीश नरवाडे यांच्या शेतात दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान तब्बल ९ फूट लांबीचा व सुमारे २० किलो वजनाचा जिवंत अजगर आढळून आला. अचानक अजगर दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व बघण्यासाठी मोठी गर्दी जमली. दरम्यान, सर्पमित्र गजानन येरवाळ, करण येरवाळ, मंगेश येरवाळ, कृष्णा भेलके, आकाश चव्हाण, चेतन चौरे, पांडु राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने अजगराला सुरक्षित पकडून जंगलात सोडले.