तुमसर: मिटेवानी येथे भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, तुमसर पोलिसांचा तपास सुरू
तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथे भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि. 9 नोव्हेंबर रोज रविवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. यातील महेश शहारे रा. साखळी, ता. तुमसर असे मृतकाचे नाव असून तो सायकलने तुमसरकडे जात असता रेतीने भरलेला भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत महेशचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करीत आहेत.