कराड: कराड तालुक्यातील दक्षिण भागात उंडाळे येथे वन विभागाने बसवली ए.आय. वर आधारित सायरन सिस्टीम; बिबट्या दिसताच वाजणार सायरन
Karad, Satara | Oct 19, 2025 वन विभागानं मानव आणि बिबट्याचा संघर्ष कमी करण्यासाठी एआयवर आधारित यंत्रांचा वापर सुरू केला आहे. कराड तालुक्याच्या दक्षिण भागात उंडाळे येथे प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. वनविभागाने रविवारी दुपारी तीन वाजता अधिकृत माहिती दिली आहे. एआयचा सर्वच क्षेत्रात वापर होताना आता चक्क मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षावर तोडगा म्हणून सातारा जिल्ह्यात करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यामध्ये थेट अलर्ट मिळत असल्यानं जीवितहानी टळणार असून शेतकऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळणार आहे.