रामटेक: गहू तलाव मोक्षधाम रामटेक परिसरातील विहिरीत उडी घेऊन एका व्यक्तीची आत्महत्या
Ramtek, Nagpur | Mar 29, 2026 जुने गहू तलाव मोक्षधाम रामटेक परिसरातील मोठ्या विहिरीत रविवार दिनांक 29 मार्चला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान दारू प्यालेल्या एका व्यक्तीने बाजूलाच उपस्थित काही लोकांच्या डोळ्यादेखत उडी घेतली. हे पाहून प्रत्यक्षदर्शीनी आरडाओरड केली. मृतकाचे नाव गणेश उर्फ बापू रहाटे रा. मंगळवारी वार्ड रामटेक वय अंदाचे 48 वर्षे असे सांगण्यात आले आहे. तो डेकोरेशनचे काम करीत असल्याची माहिती आहे.