ठाणे: दिवा येथे दुकानातच शिरून चोरी, सीसीटीव्हीतून वाचण्यासाठी चोरट्याची अनोखी शक्कल, दुसरा सीसीटीव्ही आला समोर
Thane, Thane | Sep 16, 2025 दिवा येथे एक चोरीची घटना घडली आहे.एक चोरटा दुकानांमध्ये शिरला आणि दुकानांमध्ये असलेले सीसीटीव्ही मध्ये आपण येऊ नये, पोलिसांनी आपल्याला पकडू नये यासाठी त्याने दुकानात लावलेला एक सीसीटीव्ही पाहिला आणि त्याला झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानांमध्ये असलेल्या दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला असून हा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये दुकानदाराने तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीमिळतआहे