पेण: चुलत मामाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार
पेण शहरातील संतापजनक घटना
Pen, Raigad | Aug 17, 2025 पेण शहरातील कोंबडपाडा, चावडीनाका येथे अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत मामाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री उघडकीस आली असून या प्रकरणी पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी व आरोपी विधीसंघर्षित बालक हे एकमेकांचे नात्याने चुलत मामा भाची आहेत. आपसातील ओळख व नातेसंबंधाचा गैरफायदा घेत आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्याशी वारंवार अश्लील व अनैतिक कृत्य केले.