कंधार: फुलवळ टोलनाका जवळ ११ लाख ६० हजार १२० रूपयांचा २९९ क्वींटल शासकीय राशनचा तांदूळ अवैध विक्री प्रकरणी कंधार पोलीसात गुन्हा
Kandhar, Nanded | Sep 14, 2025 नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील फुलवळ टोलनाका जवळ दि १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास यातील आरोपी परमेश्वर जाहिर हा शासकीय वाटप प्रणालीतील शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येणारा २९९ क्विंटल तांदूळ किमती ११ लाख ६० हजार १२० रुपयांचा आपले ताब्यातील ट्रक क्रमांक पीबी ०४ एएफ ८४४८ किमती २५ लाख रूपये यामध्ये अवैध रित्या काळया बाजारात विक्री करण्यासाठी वाहतूक करीत असताना मिळुन आला. याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.