अलिबाग: अलिबागमध्ये होणार महापुरुषांच्या विचारांचा जागर
Alibag, Raigad | May 16, 2026 अलिबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून समाज प्रबोधनाचे काम केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून महापुरुषांचे विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी अलिबागमध्ये महापुरुषांच्या विचाराचा जागर रविवारी (17 मे) होणार आहे. स्मारक समितीच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत होणार आहे.