नागपूर शहर: छतावर खेळताना ५ वर्षीय बालकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू: संदीप बुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 3 जून ला दुपारी 4 वाजता मिडालेल्या माहितीनुसार नागपूरच्या यशोधरा नगर भागात एका ५ वर्षीय बालकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत झाला. मोहम्मद सहात अहमद उर्फ अरशद (वय ५ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.