नागपूर शहर: धडाकेबाज कामगिरी: ७२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; आरोपीला शस्त्रांसह अटक
सहा मेला रात्री नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील गुन्हे शाखा युनिट ५ ने अत्यंत वेगाने तपास करत भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या ७२ तासांत छडा लावला आहे. या कारवाईत १९ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आले आहे. रागीर निजाम अन्सारीयाला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे चोरीचे दागिने आणि एक धारदार लोखंडी चाकू आढळून आला. पोलिसांनी आरोपीकडून एकूण १,९२,३०० रु