धानोली मेघे शिवारात सर्पमित्र प्रणित भगत यांनी अजगराला दिले जीवनदान
Seloo, Wardha | Oct 15, 2026 सेलू तालुक्यातील धानोली मेघे शेत शिवारात सात फुटी अजगराने कोंबडी गिळंकृत केली. सर्पमित्र प्रणित भगत यांच्या ही बाब निदर्शनात आली. त्यांनी लागलीच अजगराला मोठ्या शिताफीने रेस्क्यू करून याची माहिती सेलूचे सहवन क्षेत्र अधिकारी जयप्रकाश गावंडे व वनरक्षक स्विटी दांडगे यांना याची सूचना दिली. त्यांनी लागलीच घटनास्थळी दाखल होत. अजगराला आपल्या ताब्यात घेऊन त्याला जंगल अधिवासात सोडण्यात आले.