तुमसर: मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी मित्रांसोबत वैनगंगा नदीवर आंघोळीला गेलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा नदीच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. १४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास मौजा तामसवाडी येथील वैनगंगा नदी पात्रात घडली. क्षितीज लिलाधर लांजेवार (१६), रा. तामसवाडी असे मृतक मुलाचे नाव असून, तो सणानिमित्त गावातील मित्रांसोबत नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला होता. याप्रकरणी घटनेचा मर्ग तुमसर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.