जालना: शहरातील जिल्हा परिषद परिसरामध्ये सि. टू. सामाजिक संघटनेचे जेलभरो आंदोलनाला सुरुवात
Jalna, Jalna | Aug 10, 2026 आज दिनांक 10 ऑगस्ट 2026 वार सोमवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जालना शहरातील जिल्हा परिषद परिसरामध्ये सि.टू.या सामाजिक संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे यामध्ये त्यांची मागणी आहे की राज्यात व देशात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या तसेच सरकारी कामगार तसेच अंगणवाडी सेवा कर्मचारी यांना कायमस्वरूपी पेन्शन योजना लागू करा यासारख्या विविध मागण्या घेऊन या जलभर आंदोलनाला सुरुवात झाली आहे.