रामटेक: पेंच व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत चोरबाहुली वनपरिक्षेत्र विभागा द्वारे शेतकऱ्यांना वाटप केल्या झटका मशीन
Ramtek, Nagpur | Mar 23, 2026 पेंच व्याघ्र प्रकल्पा तर्फे वन्यजीव संरक्षणासोबतच शेतकऱ्यांच्या हिताचे भान राखत वाढत्या मानव व वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जंगलालगतच्या शेतकऱ्यांच्या सुरक्षितेसाठी सोमवार दि. 23 मार्चला दुपारी एका कार्यक्रमातून सोलर आधारित झटका मशीनचे वितरण करण्यात आले. बोरडा गावालगतच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावे. हा या मागचा उद्देश असल्याचे चोरबाहूली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी सांगितले.