नागपूर शहर: सदर उडान पुलावर भीषण अपघात,सुदैवाने जीवितहानी नाही
आठ जूनला सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सदर उडान पुलावर कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. या अपघातात कारच्या समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. कार चालकाने दिलेल्या माहितीनुसार समोरून आलेल्या एका चार चाकी वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चेपला गेला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी काही वेळासाठी वाहतूक कोंडी देखील झाली होती.